Posts

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.00 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 111.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 8.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-8.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-63.00 मि.मि., कर्जत-1.80 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-4.00मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-3.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 144.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.00 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   3.55 टक्के इतकी आहे. 0000

जिल्हा नियोजन भवनाचे थाटात उद्घाटन नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास मान्यता देऊ-मुख्यमंत्री श्री.फडणवीस

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते   थाटात ई-उद्घाटन करण्यात आले.   या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस   यांनी व्हिडिओ संदेश पाठवून रायगड जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या.   तसेच अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या रु.50 कोटी रुपायांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देऊ अशी घोषणाही फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा शेजारी आयोजित या सोहळ्यास राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.बाळराम पाटील, विधानसभा सदस्य सर्वश्री   आमदार सुरेश लाड, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंड...

जिल्हा नियोजन समिती बैठक : 211 कोटींच्या कामांना मंजूरी : जिल्हा विकासाचा निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित- पालकमंत्री चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या आढावा बैठकीत वार्षिक आरखड्यातील 211 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजूरी देण्यात आली.   जिल्हा नियोजन समितीचा निधी यंत्रणाकडून वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी दिले.               आज जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.   या बैठकीस पालकमंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.बाळराम पाटील, विधानसभा सदस्य सर्वश्री   आमदार सुरेश लाड, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुन...

कंत्राटी कामगार व प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.   शासकीय विश्रामगृह येथे आयोजित मौजे रासळ येथील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत   ते बोलत होते.             यावेळी आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भाईर, आ.बाळाराम पाटील,   प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), श्रीमती वैशाली माने आदि उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, की रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन कंपनी व्यवस्थापनाने त्यांना योग्य त्या सुविधा देऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सह...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 29 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 29.63 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 102.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 45.00 मि.मि., पेण-31.00 मि.मि., मुरुड-44.00 मि.मि., पनवेल-18.50 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-9.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-39.00 मि.मि., रोहा-42.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-10.00मि.मि., पोलादपूर-28.00, म्हसळा-80.00मि.मि., श्रीवर्धन-48.00 मि.मि., माथेरान-25.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 474.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 29.63 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   3.27 टक्के इतकी आहे. 0000

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न

Image
नवी मुंबई, दि. 14  : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळेचे आयोजन आज ग्रामविकास भवन,  खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय ग्राम विकास विभागाच्य अतिरिक्त सचिव अलका उपाध्याय, केंद्रीय कौशल्य विभागाचे सह सचिव चरणजित सिंग,  ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला हे उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविला जातो. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था यांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते व त्यामधून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात. या कार्यशाळेची थीम  “ कौशल्य विकास ”  ही होती. कुठलेही काम करताना त्यामध्ये कौशल्य असणे खूप महत्वाचे असते. कौशल्य विषयक प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या योजने अतंगर्त ग्रामीण भागातील तरुण सुशिक्षित बेरो...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.45 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 72.99 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 14.00 मि.मि., पेण-12.10 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-1.00 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-13.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-18.50मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-57.00मि.मि., श्रीवर्धन-32.00 मि.मि., माथेरान-27.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 295.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 18.45 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   2.32 टक्के इतकी आहे. 0000