Posts

सखी केंद्र ठरले पिडीत महिलांसाठी आधारवड

       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथी महिला व बालविकास विभागाचे सखी केंद्र हे पिडीत, संकटग्रस्त महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे सखी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.   (One Stop Centre) म्हणून   पिडीत, अत्याचारग्रस्त, संकटग्रस्त   महिलांना सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली मिळावी   यासाठी   ही सखी केंद्र सुरु करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही हे केंद्र सुरु आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालयाअंतर्गत हे केंद्र आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,   या केंद्रामार्फत   मोफत निवास , वैद्यकीय सेवा, कायदेशीर सेवा, समुपदेशन,   संकटकाळात प्रतिसाद व संकटमुक्ती सेवा,   गुन्हा दाखल करण्यासाठी   किंवा कौटूंबिक अत्याचाराचा अहवाल तयार करण्यासाठी पोलीस सहाय्य,   अन्य शासकीय विभागांची मदत,   व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा इ. सर्व सेवा मोफत पुरविल्या जातात. जुन 2017 मध्ये हे ...

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    शासनाच्या मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड- अलिबागचे स्थलांतर झाले आहे,असे मत्स्य व्यवसाय   प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी कळविले आहे. हे कार्यालय जुन्या मच्छि मार्केट समोर, अलिबाग कोळीवाडा , अलिबाग येथून दि.1 जुलै पासून   102/103, बी विंग, पहिला मजला, समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्या. घरत आळी, मु.पो. ता. अलिबाग जि. रायगड पिन-402201 येथे स्थलांतरीत झाले आहे. तरी या कार्यालयाशी होणारा पत्रव्यवहार या पत्त्यावर करावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी केले आहे. 00000

रिजर्व बॅंकेचा उपक्रमःआर्थिक साक्षरता मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    भारतीय रिजर्व बॅंकेच्या आर्थिक सहभागीता आणि विकास उपक्रमांतर्गत आज अलिबाग येथे क्षेत्रिय आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यास रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील महिला बचत गट संचालिका, शेतकरी गटांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.             अलिबाग शहरातील आदर्श भवन येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना, रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, नाबार्डचे सुधाकर रघतवान,   लीड बॅंकेचे व्यवस्थापक आनंद निंबकर, ग्रामिण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे( आरसेटी) विजय कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील विविध बॅंकांचे शाखा व्यवस्थापक, तसेच सेवा केंद्र संचालक आदी उपस्थित होते. यावेळी महाना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बोलतांना महाना यांनी उपस्थितांना   आर्थिक साक्षरता आणि   बॅंकांशी निगडीत आर्थिक व्यवहारांची आवश्यकता सांगितली. बॅंकांद्वारे केले जाण...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 112 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 112.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1397.08 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 65.00 मि.मि., पेण-210.00 मि.मि., मुरुड-62.00 मि.मि., पनवेल-99.40 मि.मि., उरण-74.00 मि.मि., कर्जत-176.20 मि.मि., खालापूर-127.00 मि.मि., माणगांव-143.00 मि.मि., रोहा-88.00 मि.मि., सुधागड-82.00 मि.मि., तळा-88.00 मि.मि., महाड-66.00मि.मि., पोलादपूर-80.00, म्हसळा-120.00 मि.मि., श्रीवर्धन-80.00 मि.मि., माथेरान-232.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1792.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 112.04 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   44.46 टक्के इतकी आहे. 0000

नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणःराजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाति/नवबौध्द विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष याप्रमाणे- ·          महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील असावा. ·          महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ·          कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 6.00 लाखापेक्षा कमी असावे. ·          पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी असेल. ·          अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापी त्यापुढील वर्षाच...

योजना : गुणवंत खेळाडू पेन्शन योजना

            भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांनी गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे सक्रिय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे यासाठी गुणवंत खेळाडू पेन्शन योजना लागू केली आहे.             ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि आलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. निवडीचे निकष- सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांचे ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळा...

वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पोर्टलवर अर्ज पाठवावे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेली माहिती अशी की, कमर्शियल पायलट लायसन्स कार्सकरिता शिष्यवृत्ती हि योजना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत राबविण्यात येत होती. तथापि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनान्वये अनु. जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता 1 एप्रिल, 2018   पासून   भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गंत कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स हा अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. सदरील (CPL) कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स ही योजना केंद्र शासनाच्या Top Class Education Scheme (SC) या योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी   थेट केंद्रशासनाकडे   नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलव्दारे सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. 00000