Posts

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 953 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 03

        अलिबाग,जि.रायगड, दि.26 (जिमाका) : -   स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 953 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 170 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-506, पनवेल ग्रामीण-206, उरण-47, खालापूर-26, कर्जत-45, पेण-41, अलिबाग-55, मुरुड-5, माणगाव-13, तळा-1,   रोहा-32, श्रीवर्धन-8, महाड-10, पोलादपूर-8 अशी एकूण 1 हजार 03 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1126, पनवेल ग्रामीण-303, उरण-187, खालापूर-13, कर्जत-40, पेण-44, अलिबाग-43, मुरुड-17, माणगाव-57, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-26, पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 953 आहे.        ...

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.             शनिवार दि.27 मे, 2020 सकाळी 9.45 वा. सुनिती शासकीय निवासस्थान येथून मोटारीने भाऊचा धक्काकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. भाऊचा धक्का येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे व खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्यासमवेत रो-रो-जेट्टीने मांडवा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मांडवा येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे, खा.सुनिल तटकरे, खा.अमोल कोल्हे यांच्या समवेत मोटारीने नांदगाव, ता.मुरुड कडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. नांदगाव, ता.मुरुड येथे आगमन व श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालय येथे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळेची पाहणी व मदत वाटप कार्यक्रम. सकाळी 12.30 वा. नांदगाव येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. अंजूमन-ए-इस्लाम हायस्कूल, मुरुड येथे ...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधी आढावा बैठक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड जिल्हा कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे शनिवार दि.27 जून, 2020 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., पनवेल महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,   सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग, महाड, पनवेल, कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण यांना उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे. 00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या 146 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.   यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, सहाय्यक आयुकत्, समाज कल्याण श्री.रविकिरण पाटील, तहसिलदार सतिश कदम, विशाल दौंडकर, नायब तहसिलदार श्री.वैशंपायन यांची उपस्थिती होती. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2.14 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.14 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 485.12 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 00.00 मि.मि., पेण-00.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-00.00 मि.मि., कर्जत-10.60 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-2.20 मि.मि., सुधागड-00.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-5.00, म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-1.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 34.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.14 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 15.48 टक्के इतकी आहे. 00000

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 1 हजार 736 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 758

वृत्त क्रमांक :- 783                                                       दिनांक :- 23 जून 2020         अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 736 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-393, पनवेल ग्रामीण-141, उरण-34, खालापूर-7 कर्जत-40, पेण-36, अलिबाग-43, मुरुड-1, माणगाव-12,   रोहा-23, महाड-20, पोलादपूर-8 अशी एकूण 758 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च...

स्थलांतरीत मजूरांनी त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी --जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):-   जिल्हयातील स्थलांतरीत मजूर त्यांच्या   राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी   https://migrant.mahabocw.in/migrant/form   या संकेतस्थळावर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निधी   चौधरी यांनी केले आहे.               स्थलांतरीत मजूरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.6/2020 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या   कामगार विभागाने स्थलांतरीत मजूरांच्या नोंदणी करिता   https://migrant.mahabocw.in/migrant/form   हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी रायगड जिल्हयातील स्थलांतरीत मजूर जे त्यांच्या   राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी या   संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्हयात खालील कार्यालयांमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk) तयार करण्यात आले असून   या   मदत कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत-   तहसील कार्यालय, पनवेल: 022 - 27452399,   कामगार उपायुक्त कार्यालय पनवेल...