Posts

कर्जत येथील 'रक्षा सामाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान

     अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जगभरामध्ये जीवघेण्या करोना विषाणूची परिस्थिती असून,जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा महाड येथील तारीख गार्डन या  इमारत दुर्घटनेच्या  वेळी आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना नि:स्वार्थपणे  माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आलेल्या  बचावपथकांना, विविध संस्थांना व व्यक्तींना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार  सुरेश काशिद, तहसिलदार सतिश कदम यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात काल दि.18 सप्टेंबर राेजी एका  छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.         या  सत्कारमूर्तींमध्ये रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.         जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळ...

*अनोंदणीकृत उद्योजकांसाठी महास्वयंम् वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवरची सुविधा*

अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम् वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे अधिसूचित करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम् या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर नावाची नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.        अनोंदणीकृत उद्योजकांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर  या मेनूवर क्लिक करुन  पेजवर कंपनीची माहिती भरावी. भरलेल्या माहितीच्या आधारे मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करावा. ३० मिनिटात उद्योजकाच्या ई-मेल वर उमेदवारांच्या यादीची लिंक प्राप्त होईल. त्या लिंकद्वारे उद्योजकांस उमेदवारांची यादी प्राप्त  होईल. महास्वयंम् वेबपोर्टलवर सर्व सुविधा उद्योजकांसाठी मोफत आहे.  या सुविधेच्या अधिक  माहितीसाठी अथवा काही अडचण असल्यास ०२१४२-२२२०२९ या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग ...

जनतेच्या सहकार्यातून करोनाचे उच्चाटन निश्चित* *--पालकमंत्री आदिती तटकरे*

*श्रीवर्धनमध्ये "माझे कुटुंब- माझी जबाबदारी" संदेश घेऊन पालकमंत्री आदिती तटकरेंनी  नागरिकांचे केले आरोग्य प्रबोधन* अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका):- करोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने "माझे कुटुंब-माझी जबाबदारी"ही मोहीम दि. 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून करोना विषाणूचा समर्थपणे सामना करीत त्याचे उच्चाटन निश्चित होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे व्यक्त केला.             श्रीवर्धन नगरपरिषदेत प्रसारमाध्यम  प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बाेलत हाेत्या. यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, दर्शन विचारे  आदी उपस्थित होते .          करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे राज्यभर विविध ठिकाणी अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. ही बाब गांभिर्याने घेऊन आपण प्रत्येक ग्रामनिहाय करोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातू...

माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

                अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :-  गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वचजण करोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. करोनाचा सर्वत्र वाढत असलेला प्रादूर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 सप्टेंबरपासून शासनाने  “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ”  या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ केला असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या शासनाच्या आरोग्य तपासणी पथकाला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.                 यावेळी जिल्हाधिकारी निधी...

महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफ पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील* *--पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मात्र अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळे तालुक्यातील होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी बचावकार्यासाठी महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचे एक पथक कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास कार्यक्रमात त्या बोलत होत्या.        यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सतिश कदम, तहसिलदार सुरेश काशीद आदि उपस्थित होते.      यावे...

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 33 हजार 249 जणांनी केली करोनावर मात*

          अलिबाग,जि.रायगड दि. 18 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 33 हजार 249 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 615 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 137, पनवेल ग्रामीण-801, उरण-182, खालापूर-268, कर्जत-241, पेण-494, अलिबाग-653, मुरुड-69, माणगाव-381, तळा-44, रोहा-441, सुधागड-58, श्रीवर्धन-55, म्हसळा-43, महाड-165, पोलादपूर-38 अशी एकूण 6 हजार 070 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 552, पनवेल ग्रामीण-4 हजार 280, उरण-1 हजार 436, खालापूर-1 हजार 914, कर्जत- 1 हजार 102, पेण-2 हजार 610, अलिबाग-3 हजार 078, मुरुड-241, माणगाव- 1 हजार 136, तळा-91, रोहा-1 हजार 527, सुधागड-278, श्रीवर्धन-263, म्हसळा-232, महाड- 1 हजार 238, पोलादपूर-271 अश...

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

           अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :-   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.. शनिवार दि.19 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी, ता.रोहा, येथून वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 11.00 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत म्हसळा येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 1.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा.   माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत माणगाव येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. माणगाव येथून शासकीय वाहनाने ता.तळाकडे प्रयाण. दुपारी 5.30 वा....