Posts

आय.आय.एच.टी. बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू

  अलिबाग, दि.09 (जिमाका):-  केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13+1 व वेंकटगिरीकरिता 02 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर /सोलापूर/ मुंबई/ औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.10 जून 2022 पर्यंत मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि.10 जून 2022 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय यांच्याकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या  http://dirtexmah.gov.in/  या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शितल तेली-उगले यांनी कळविले आहे. 00000

आपत्ती येऊच नये.. मात्र आलीच तर सज्जता हवी - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग, दि.09 (जिमाका):-  मनातील खरी इच्छा आहे ती आपत्ती येऊच नये अशी.. मात्र आलीच तर उद्भवलेल्या परिस्थितीस तोंड देण्याची आपली सर्व प्रकारची सज्जता हवी आणि ही सज्जता केवळ प्रशिक्षणामुळेच येऊ शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. महासमादेशक, होमगार्ड, नागरी संरक्षण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथील जंजिरा सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, मुंबई श्री.संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, प्रांताधिकारी श्री.प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मीनल दळवी, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे उपनिरीक्षक प्रकाश सोनटक्के, होमगार्ड पुरुष महिला जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे स्वयंसेवक श्री.गुरुनाथ साठलेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, जिल्हा नियोजन, स्थानिक आमदार निधी, जिल्हा आपत्ती व्य...

नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा - विभाग नियंत्रक अनघा बारटक्के

Image
  “ एस.टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास ” अलिबाग, दि.05 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आलेला असल्याने   रायगड  राज्य परिवहन  विभागातील सर्व आगारांमार्फत (महाड / अलिबाग / पेण / श्रीवर्धन / कर्जत / रोहा / मुरुड / माणगाव) दैनंदिन वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत रायगड  राज्य परिवहन  विभागातील सर्व आगारांमार्फत मिळून 850 फेऱ्या सुरू आहेत . तरी नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक,   पेण   अनघा बारटक्के यांनी केले आहे. 00000

रायगड जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Image
अंमली पदार्थाच्या संकटापासून  वाचविण्याचा केला संकल्प   अलिबाग, दि.05 (जिमाका):-  गृह विभागाच्या  दि.25 मार्च 2022 च्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-0122/प्र.क्र.01/दिशा-3 अ अन्वये जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी  “ जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती ”  ची स्थापना करण्यात आलेली असून या समितीची बैठक काल दि.04 मे 2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सदस्यांनी समाजातील विविध घटकांना अंमली पदार्थांच्या संकटापासून वाचविण्याचा संकल्प केला. या बैठकीस सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.जयवंत रामकृष्ण झोपे ,  सीमा शुल्क विभागाचे निरीक्षक श्री.सुभाष गोपाळ राणे ,  राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या  अधीक्षक श्रीमती कीर्ती भाऊसाहेब शेडगे ,  कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री.गोरखनाथ रघुनाथ मुरकुटे ,  अन्न व औषध प्रशासन ,  पेणचे औषध निरीक्षक श्री.हेमंत राजाराम आडे ,  रायगड डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री.मिलींद अनंत पाटील ,...

महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
  अलिबाग, दि.05 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबईचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा) हे दि.07 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथे दौऱ्याकरिता येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे. सकाळी 10.30 वाजता ओशिवरा मुंबई येथून डीव्ही कारने माणगावकडे प्रयाण. दुपारी 02.30 वाजता माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 03.00 ते 04.30 अनुसूचित जाती/जमातीच्या संघटना प्रतिनिधींशी चर्चा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून निवेदने स्विकारणे व त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा. सायंकाळी 05.00 ते 06.00 उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी अनुसूचित जाती जमातीच्या प्रशिक्षणार्थ आयोजित केलेल्या कौशल्य शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 06.00 वाजता माणगाव येथून डीव्ही कारने मुंबईकडे प्रयाण. 00000

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन 2022-23 सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू

  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा, क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अर्हता पुढीलप्रमाणे आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षा आतील मुले-मुली आहेत अशा खेळाडूंना संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणी:  क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षाचे आत मुले-मुली आहेत अशा खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल. अनिवासी प्रवेश प्रक्रिया:  अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रव...

जिल्ह्यात दि.07 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अलिबाग, दि.04 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात दि.07 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी सांगितले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे अॅक्टखालील प्रकरणे दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था इतर थकबाकी बाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले शुल्क परत मिळते. त्यामुळे शनिवार, दि.07 मे 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ ...