आय.आय.एच.टी. बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू
अलिबाग, दि.09 (जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13+1 व वेंकटगिरीकरिता 02 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर /सोलापूर/ मुंबई/ औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.10 जून 2022 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि.10 जून 2022 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय यांच्याकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://dirtexmah.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शितल तेली-उगले यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment