Posts

स्वदेस फाउंडेशन तर्फे जागतिक हृदयरोग दिन साजरा

Image
  अलिबाग,दि.30 (जिमाका):-   स्वदेस फाउंडेशनच्या डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत दि.29 सप्टेंबर रोजी आरोग्य कार्यकर्ते,  हृदयरोगी रुग्णांचा परिवार यांच्यासोबत  “ जागतिक हृदय दिन ”  साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन डॉ.भरत दळवी यांनी हृदयरोगावर दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. डॉ.भरत दळवी हे ग्लेनमार्क कार्डियाक सेंटर, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल आणि रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत. आरोग्य कार्यकर्त्यांनी जन्मजात हृदयरोग कसे ओळखायचे, हृदयरोगावर कुठे आणि कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, उपचारानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायची, याविषयीचे सखोल व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन डॉ.दळवी यांनी केले व आरोग्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या शंकांचे निरसन केले. रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेसने फाउंडेशनने 2014 पासून आतापर्यंत हृदयविकाराचा त्रास असलेल्या 185 मुलांची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे...

नवरात्रोत्सवात ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपण व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची परवानगी

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-  रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सन 2022 या वर्षाच्या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम 3 नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यत जिल्ह्यात 15 दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. अधिसूचनेद्वारे नवरात्र उत्सवाच्या कालावधीत पंचमी, अष्टमी व नवमी असे एकूण तीन दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच दि.1 ऑक्टोबर 2022 या दिवशी नवरात्रोत्सवासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत निर्देश दिलेले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास देण्यात आलेल्या सूटमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी त्यांना प्राप्त अधि...

सेवा पंधरवडा अंतर्गत विविध शैक्षणिक योजनांबाबत खारघर येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  राज्य शासन व केंद्र शासन यांच्या वतीने सेवा पंधरवडा दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधी दरम्यान साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड व जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, अलिबाग यांच्या वतीने दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेबाबत तसेच विदयार्थ्यांना सामजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मनी मार्जिन योजना, परदेशी शिष्यवृती, शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया तसेच समान संधी केंद्र, जात  वैधता प्रमाणपत्र इत्यादी योजनेच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरुन घेण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव व रायगड जिल्हा जात पडताळणी समिती संशोधन अधिकारी रविकिरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना ...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” साजरा केला जाणार

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  शासनामार्फत  “ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस ”  साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुने पनवेल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट ई-क्लासरुम चे उद्घाटन व शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  माणगाव तालुक्यातील   शासकीय निवासी शाळा जावळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांकरिता स्मार्ट ई-क्लासरुम   (Smart E-classroom) चे ऑनलाईन उद्घाटन मुंबई विभाग समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे व रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव व गृहपाल श्री.संदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षण पद्धतीत होणाऱ्या नवनवीन बदलानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे काळानुरूप अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या प्रयत्नातून अनुसूचित जाती उपाययोजनेतून अत्याधुनिक पद्धतीचे ई-लर्निंग स्मार्ट क्लासरूम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये दृकश्राव्यद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन करणे अत्यंत सोपे झाले आहे. खडू, फळा व डस्टर या साहित्याचा वापर न करता अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन घेणे व अभ्यासाचे उत्कृष्ट पद्धतीने दृढीकरण करणे आता...

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभाकरिता माणगाव येथे कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने  “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ”  कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती अर्ज भरणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र याबाबत माहिती देण्याकरिता माणगाव येथील डी.जी. तटकरे महाविद्यालय येथे दि.27 सप्टेंबर 2022 रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमादरम्यान महाविदयालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. भारत सरकार शिष्यवृत्तीचे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील अर्ज भरण्यास दि.22 सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली आहे. त्याबाबत महाविद्यालये व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शिष्यवृत्तीच्या इतर योजनांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेचे मार्गदर्शन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल जाधव यांनी केले. या कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. रायगड अलिबाग कार्यालयामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र काढताना विदयार...

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात आपत्ती व्यवस्थापन शिबिर संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येवून उच्च शिक्षणासाठी आपण साऱ्याजणी आपली व कुटुंबाची प्रगती करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहत आहात. आपल्या गावाचे आणि घराचे नाव उज्वल करा आणि नेहमीच्या जीवनात आपत्तीला सामोरे कसे जावे, याचे ज्ञान आत्मसात करा. हे ज्ञान आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि ग्रामस्थांनाही द्या, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व रायगड भूषण पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल येथे केले. पनवेल येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, संपादक नंदकिशोर धोत्रे, वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती मीनू नरहरे व आपत्ती सुरक्षा मित्र किशोर पाटील, विकास रणपिसे हे उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जयपाल पाटील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली तर पाहुण्यांचे स्वागत गृहपाल श्रीमती नरहरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात श्रीमती नरहरे यांनी सामाजि...