Posts

म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Image
    रायगड दि.17 (जिमाका) :-  महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.43 कोटी इतक्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. म्हसळा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, खासदर सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान प...

महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर

Image
रायगड दि.16 (जिमाका) :-  निर्माता रत्नकांत जगताप यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याऱ्या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. 'जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय. !' या जयजयकारांने परिसर दूमदुमला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदानावर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम काल झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.        स्थानिक कलाकार अमोल कापसे यांनी सादर केलेला अवतार गाथा 'कार्यक्रम उपस्थितांचे उत्कृष्ट मनोरंजन करुन गेला. यानंतर 'महाराष्ट्राची लोकधारा' या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. गणेश नमनाने दमदार सुरुवात करत 'बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..' तसेच 'कानडा राजा पंढरीचा' अशा गीतातून साकारलेल्या  पंढरीच्या वारीने उपस्थित रसिकांनाही वारकरी बनविले. 'झूंजूमुंजू पहाट झाली.., नभं उतरु आलं....

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

  रायगड दि.16(जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि.19 मार्च 2024  या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दि.01 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबईचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे. या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.15 फेब्रुवारी 2024 पासून कार्यान्व...

अनुसूचित जाती (sc) प्रवर्गासाठीचे 18 दिवसीय निवासी उद्योजकीय प्रशिक्षणाचे समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

    रायगड दि.16(जिमाका) :-   उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शांसन  मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) रायगड आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक,व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण नुकतेच आज अलिबाग येथील तारांगण रिसॉर्ट मध्ये सामारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगडचे  प्रकल्प अधिकारी  आनंद विद्यागर, उद्योजक ज्ञानदेव खंडारे, प्राध्यापक श्री.आचार्य, दयानंद चतुर  हे उपस्थित होते. यावेळी श्री.विद्यागार यांनी  मार्गदर्शन  करुन   मागील 18 दिवसांचा  प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला.  त्यामध्ये उद्योग निवडी पासून उद्योग सुरु करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.  उद्योग संधिशोध CFTRI डायरेक्टर  डि.के. आहुजा, इंड...

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी

    रायगड दि.16(जिमाका) :-  रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली रसायनी रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तीमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मिक घटना घडत असतात.  त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थितो निर्माण होत आहे. दि. 23 जानेवारी 2024 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समितो महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्याध्यक्ष,श्री.जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे,कोळीवाड्याचे सिमाकंन करावे, मच्छिमार बांधवाना उर्वरित डिझेल परतावा मिळावा इतर मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उप...

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत--उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते

    रायगड दि.16(जिमाका) :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जड वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांनी केले आहे. तसेच एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता कार्यालयोन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनार्जर्पण चा विचार केला ...

संत सेवालाल महाराज यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

       अलिबाग, दि. 15 (जिमाका):- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) शसंतोष शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       यावेळी तहसीलदार (सा. प्र.)उमाकांत कनडोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.