Posts

किहीम येथे महा श्रमदान मोहीम कार्यक्रम संपन्न

    रायगड(जिमाका)दि.01:-  स्वच्छता ही सेवा अभियान  अंतर्गत  जिल्ह्यात  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग श्रीमती शुभांगी नाखले  यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम होत आहेत. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या बाबिस अनुसरून ग्रामपंचायत किहीम ता.अलिबाग येथे ग्रामस्थ, एन.एस.एस चे विद्यार्थी, लायन्स क्लबचे सदस्य व माणुसकी प्रतिष्ठानचे सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी  व कर्मचारी यांच्यासंयुक्त विद्यमाने महाश्रमदान मोहीम उत्साहात संपन्न झाली.            यावेळी किहिमचे सरपंच शांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले प्रत्येकाने स्वच्छता सवयी अंगी कारून आपले घर,परिसर गाव स्वच्छ ठेण्यास कायमस्वरूपी  प्रयत्न करावा. किहीम ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता राहण्यासाठी किहीम ग्रामपंचायत सतत कार्यरत असते. स्वच्छता अभियानामुळे आरोग्य मान उंचावून सर्वांची प्रगती होणार आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड म्हणाले ...

जिल्ह्यात सण,उत्सव कालावधीकरिता मनाई आदेश जारी

  रायगड(जिमाका)दि.01:-  रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधुन वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम हा माहीती कार्यालय युक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. दि.25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने श्रीमती रूपाली नाकाडे, अध्यक्ष अमेदा या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देवून सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरू...

काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास दि.31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड(जिमाका)दि.01:-   राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती.  या योजनेसाठी अर्ज सादर करावयाची मुदत दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली असून अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या  www.msamb.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बँक तपशिल, आधारकार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अध...

माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा,विर माता व वीर पिता यांच्या यथोचित सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड (जिमाका)दि.27 :-  भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्टाईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या  अभिमानास्पद कामगिरीबद्दल माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी जंजिरा सैनिकी विश्रामगृह गोधळपाडा, अलिबाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विर माता व वीर पिता यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून जिल्हयातील सर्व माजी सैनिक,विधवा, युध्दविधवा, वीरमाता, वीर पिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य योजनेच्या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    रायगड(जिमाका)दि.25:- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह कर्जत सनशाइन अपार्टमेंट, पहिला मजला, डी विंग, आदिवासी वसतीगृहाच्या शेजारी, जनता हायस्कूल मागे, पाटील आळी, शिवाजी नगर, दहिवली ता. कर्जत या ठिकाणी केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य या योजनेच्या मार्गदर्शक सुचना 2022 अन्वये 11 पदे 10 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर भरावयाची आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. भरावयाच्या पदांची माहिती पुढीलप्रमाणे :- भांडार रक्षक तथा लेखापाल , पद संख्या-1,मासिक मानधन एका पदास- रु.18 हजार 536, शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी (बी. कॉम असल्यास प्राधान्य),Ms-cit किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30, व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे,वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल...

1000 महाविद्यायलयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (ACKVK) उद्घाटन

    रायगड (जिमाका) दि.17:-   राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास  केंद्राचे  उदघाटन दि.20  सप्टेंबर 2024 रोजी मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वर्चुअल ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 16 महाविद्यालयामधील केंद्राचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अमंलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  “ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ”  ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. रायगड जिल्हयातील 16 महाव...

इयत्ता 6 वी च्या निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास दि.23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड(जिमाका)दि.17:-  पी. एम. श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, रायगडच्या सत्र 2025-26 करीता इयत्ता 6 वी च्या निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी, पालक, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय मनोज राऊत यांनी केले आहे. अधिक माहित्तीसाठी श्री.संतोष आर.चिंचकर मो.9881351601, श्री.अर्जुन गायकवाड मो.9862793640 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००००