माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा,विर माता व वीर पिता यांच्या यथोचित सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

 

 

रायगड (जिमाका)दि.27 :- भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्टाईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या  अभिमानास्पद कामगिरीबद्दल माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

त्यानुषंगाने रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी जंजिरा सैनिकी विश्रामगृह गोधळपाडा, अलिबाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विर माता व वीर पिता यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून जिल्हयातील सर्व माजी सैनिक,विधवा, युध्दविधवा, वीरमाता, वीर पिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान