अवयवदान जीवन देणारे महादान --पालकमंत्री प्रकाश महेता
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
|
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 29 ऑगस्ट 2016 वृत्त क्र.556
अवयवदान जीवन
देणारे महादान
--पालकमंत्री
प्रकाश महेता
अलिबाग दि.29 :- अवयवदान हे जीवन
देणारे महादान आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हे तीन दिवस
होणाऱ्या महा अभियानात सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. अवयवदान संदर्भात जनजागृती होऊन या मोहिमेत
सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी महा अभियान राबविण्यात येत आहे. या महाअभियानात
रायगड जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे,असे आवाहन
गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केले
आहे.
आपल्या आवाहनात
त्यांनी म्हटले आहे की, या महाअभियानानिमित्त
आपण आपला अवयवदानाचा महत्वपूर्ण
संकल्प करावा. या काळात
शासनाच्यावतीने अवयवदानाबाबतचे अर्ज जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करण्यात येणार
आहेत. तो प्राप्त करुन स्वत:पुढाकार घेऊन अर्ज भरुन द्यावा. तसेच कुटूंबाने देखील आपल्या आप्तांच्या
अवयवदानाच्या संकल्पनेचा आदर करुन त्यांच्या पश्चात अवयवदानासाठी पुढे यावे.
राज्यात हजारो रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आपण अवयवदानाचा
संकल्प जरी लाखोंच्या संख्येने करीत असलो तरी प्रत्यक्षात होणारे अवयवदान हे फारच
अल्प आहेत. कारण अवयवदानाचा संकल्प
केलेल्या व्यक्तींच्या मृत्यू पश्चात
त्याच्या कुटूंबाची जबाबदारी महत्वाची असते.
त्यांनीही याचा आदर करावा. या महा
अभियानानिमित्त आपण सर्व मिळून अवयवदानाचा संकल्प करु आणि एखाद्याचा जीव वाचवू.
जिल्हास्तर
समिती
हे
अभियान राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व
जिल्हाधिकारी यांच्या सहअध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात
जिल्ह्यातील खासदार सर्व आमदार, , जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, रोटरी व
लायन्स क्लबचे अध्यक्ष, सर्व पत्रकार, इंडियन मेडिकल असोशिएशन यांचा समावेश
आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव
आहेत. तर तालुका स्तरावर सभापती पंचायत
समिती हे अध्यक्ष असून त्यात स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, तहसिलदार, गटविकास
अधिकारी, पोलीस उप अधीक्षक, मुख्याधिकारी नगरपालिका,पत्रकार, डॉक्टर्स, समाज सेवक
यांचा समावेश आहे तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव आहेत.
अभियानांतर्गत इच्छुक अवयवदात्यांना 15 ऑगस्ट
2016 पासून ते 1 सप्टेंबर 2016 पर्यंत
प्रत्येक जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी किमान 3 हजार अवयव नोंदणी कार्यक्रम
निमंत्रणे व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान 1 हजार अवयव नोंदणी कार्यक्रम निमंत्रणे घरोघर जाऊन
वाटण्यात येत आहेत. मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा स्तरावर, तालुका
स्तरावर शुभारंभ व अवयवदान जागृती महारॅलीचे आयोजन , बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा स्तरावर,
तालुका स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्र, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार
आहे. तर गुरुवार दि. 1 सप्टेंबर 2016 रोजी
अवयवदान अभियान नोंदणी शिबीराचे उद्घाटन कार्यक्रम व अवयवदान नोंदणी केलेल्या
अवयवदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
000000

Comments
Post a Comment