महाड दुर्घटना शोध मोहिम अधिक तीव्र करणार - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले.
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
|
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :-
08 ऑगस्ट, 2016 वृत्त क्र.492
महाड दुर्घटना
शोध मोहिम अधिक तीव्र करणार
- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले.
अलिबाग दि.08 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या
दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा
शोध घेण्याची मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल. त्यांच्या शोधासाठी प्रशासन प्रयत्नांची
पराकाष्ठा करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले यांनी दिली.
प्रयत्नांची पराकाष्ठा
एन.डी.आर.एफ. च्या जवानांचे धाडसी पथक, सर्व
साहित्य सामुग्रीसह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8
डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, स्थानिक मच्छिमार बांधव, अशी सर्व
मंडळी आपले शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तसेच फिश फांयडर, लोह चुंबक, बोटीच्या तळाला अत्याधुनिक कॅमेरा लावून शोध,
सेंसरचा उपयोग अशा अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून ही शोध मोहिम सुरु आहे.
या दुर्घटनेत 40 व्यक्ती बेपत्ता झाल्या असून
आता पर्यंत एकूण 26 मृतदेह (दिनांक 08 ऑगस्ट, 2016 सकाळी 10.00 वाजे पर्यंत)
सापडले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1.)श्रीकांत
शामराव कांबळे, 2.)शेवंती मिरगल, 3.)संपदा संतोष वाझे, 4.)आवेद अल्ताफ चौगुले,
5.)पांडूरंग घाग, 6.)प्रशांत प्रकाश माने, 7.)स्नेहा सुनिल बैकर, 8.)प्रभाकर बाबुराव शिर्के, 9.)रमेश गंगाराम
कदम, 10.)मंगेश राजाराम काटकर, 11.)सुनिल
महादेव बैकर 12.)अनिश संतोष बेलेकर, 13.)अतिफ मेमन चौगुले 14.)बाळकृष्ण बाब्या
वरक, 15.)अजय सिताराम गुरव, 16.)विजय विश्राम पंडित, 17.)विनिता विजय पंडित.
18.)संतोष सोनु गवतडे 19.)दिपाली कृष्णा बेलेकर, 20.)भिकाजी रामचंद्र वाघदरे,
21.)सुरेश देऊ सावंत. 22.)महेंद्र श्रीकांत कांबळे, 23.)दिनेश सखाराम कांबळी, 24.)रमेश सखाराम
मिरगळ, 25.)अविनाश सखाराम मालप, 26.)जयेश गोपाळ बाणे.
प्रशासनाचे आवाहन
संबंधित नातेवाईक व नागरीकांना
प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू
नये व प्रशासनास सहकार्य करावे. तसेच महाड
दुर्घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण
कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे.
00000
Comments
Post a Comment