महाड दुर्घटना आज सकाळ पासून दोन मृतदेह आढळले
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
|
दिनांक :- 07 ऑगस्ट, 2016
वृत्त क्र.486
महाड दुर्घटना
आज सकाळ पासून
दोन मृतदेह आढळले
अलिबाग दि.07 :- आज सकाळी महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांच्या शोध कार्य सुरु झाल्यानंतर दोन मृतदेह सापडले असून त्यांची ओळख
पटली आहे.
मंत्री
महोदयांची पाहणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री
(सा.उ.) एकनाथ शिंदे काल पासून महाड दुर्घटना ठिकाणी असून ते
संपूर्ण शोध व मदत कार्यावर नियंत्रण ठेवून व आवश्यक त्या सूचना देत आहेत.
त्यांच्या समवेत आमदार भरतशेठ गोगावले आहेत. काल संध्याकाळी परिवहन व खारभूमी
विकास मंत्री दिवाकर रावते यांनी घटनास्थळ परिसराला तसेच शोध व मदत कक्षास भेट देऊन अप्पर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, उपविभागीय
अधिकरी श्रीमीत सुषमा सातपुते, तहसिलदार संदिप कदम यांच्याकडून शोध व मदत मोहिमेची सविस्तर माहिती घेऊन सूचना दिल्या.
मृतांची
नावे
आज दिनांक 07 ऑगस्ट, 2016 दुपार
पर्यंत 2 मृतदेह सापडले असून आता पर्यंत एकूण 26
मृतदेहांचा शोध घेण्यात आला आहे. मृतव्यक्तींची नावे पुढील प्रमाणे 1.)श्रीकांत
शामराव कांबळे, 2.)शेवंती मिरगल, 3.)संपदा संतोष वाझे, 4.)आवेद अल्ताफ चौगुले, 5.)पांडूरंग घाग,
6.)प्रशांत प्रकाश माने, 7.)स्नेहा सुनिल बैकर, 8.)प्रभाकर बाबुराव शिर्के,
9.)रमेश गंगाराम कदम, 10.)मंगेश राजाराम काटकर,
11.)सुनिल महादेव बैकर 12.)अनिश संतोष बेलेकर, 13.)अतिफ मेमन चौगुले 14.)बाळकृष्ण
बाब्या वरक, 15.)अजय सिताराम गुरव, 16.)विजय विश्राम पंडित, 17.)विनिता विजय
पंडित. 18.)संतोष सोनु गवतडे 19.)दिपाली कृष्णा बेलेकर, 20.)भिकाजी रामचंद्र
वाघदरे, 21.)सुरेश देऊ सावंत. 22.)महेंद्र श्रीकांत कांबळे, 23.)दिनेश सखाराम कांबळी, 24.)रमेश सखाराम मिरगळ, 25.)अविनाश
सखाराम मालप, 26.)जयेश गोपाळ बाणे.
00000




Comments
Post a Comment