महाड दुर्घटना शोधासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 06 ऑगस्ट, 2016                                                                                 वृत्त क्र.481
महाड दुर्घटना
शोधासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

अलिबाग दि.06 :-  महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांच्या  शोधासाठीची काल संध्याकाळी थांबविण्यात आलेली शोध मोहिम आज सकाळी पुन्हा सुरु केली असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज दुपारी तीन वाजे पर्यंत  दिनेश सखाराम कांबळी याचा मृतदेह सापडला आहे.
आज ही शोध मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून शोध घेणाऱ्या बोटीच्या तळाला अत्याधुनिक कॅमेरा बसवून त्याद्वारे शोध सुरु आहे.  एन.डी.आर.एफ. च्या जवानांचे धाडसी पथक, सर्व साहित्य सामुग्रीसह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8 डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, स्थानिक मच्छिमार बांधव अशी सर्व मंडळी आपले शर्थीचे प्रयत्‍न करीत आहेत. 
मंत्री महोदयांची पाहणी
आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाड दुर्घटना परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथे सुरु असलेल्या नियंत्रण  व मदत कक्षातील  बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांशी संवाद साधला व त्यांना दिलासा दिला. जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, अप्पर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, उपविभागीय अधिकरी श्रीमीत सुषमा सातपुते, तहसिलदार संदिप कदम यांच्याकडून  शोध व मदत मोहिमेची सविस्तर माहिती घेऊन सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनीही आमदार भरतशेठ गोगावले यांच्या समवेत घटनस्थाळास पुन्हा भेट देऊन पाहणी केली. शोध कार्याबाबत मार्गदर्शन केले.
नागरीकांना आवाहन
महाड दुर्घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून संदर्भात चुकीची माहिती अथवा फोटो टाकण्यात येत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होत असून अफवा पसरत आहेत. नागरीकांनी कृपया त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच अफवांना बळी पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
महाड दुर्घटने संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व  दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे. या ठिकाणी  माहिती तसेच मदत कार्याबाबत समन्वय  करण्यात येत आहे.
आता पर्यंत सापडलेल्या मृतदेह व त्यांची नावे
दिनांक 06/08/2016 अखेर एकूण 23 मृतदेहांचा शोध घेण्यात आला असून त्यांची ओळख पटलेली  आहे. ती नावे पुढील प्रमाणे आहेत. 1.) श्रीकांत शामराव कांबळे,   2.) शेवंती मिरगल,  3.) संपदा संतोष वाझे, 4.) आवेद अल्ताफ चौगुले, 5.) पांडूरंग घाग, 6.) प्रशांत प्रकाश माने, 7.) स्नेहा सुनिल बैकर,  8.) प्रभाकर बाबुराव शिर्के, 9.) रमेश गंगाराम कदम, 10.) मंगेश राजाराम काटकर, 11.) सुनिल महादेव बैकर 12.) अनिश संतोष बेलेकर, 13.) अतिफ मेमन चौगुले 14.) बाळकृष्ण बाब्या वरक, 15.) अजय सिताराम गुरव, 16.) विजय विश्राम पंडित, 17.) विनिता विजय पंडित. 18.) संतोष सोनु गवतडे 19.) दिपाली कृष्णा बेलेकर, 20.) भिकाजी रामचंद्र वाघदरे, 21.) सुरेश देऊ सावंत. 22.) महेंद्र श्रीकांत कांबळे,  23.) दिनेश सखाराम कांबळी.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन