26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन

26  जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन
अलिबाग,दि.19(जिमाका):- रोजी छ.राजश्री शाहू महाराज यांचा 26 जून रोजी जन्म् दिवस प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त् दि.26 जून 2017 रोजी पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  राजस्व् सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या  कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत शाळा,तालुका,जिल्हास्तरावर गुणांनुक्रमे सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रथम येणाऱ्या अनु.जाती,विजाभज,व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.असे सहाय्यक आयुक्त्, प्रसाद खैरनार समाज कल्याण,विभाग,रायगड अलिबाग, यांनी कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान