र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
अलिबाग,दि.21,(जिमाका):-कोकणातील साहित्यिक कै. र.वा.दिघे यांच्या नावाने कोकणातील साहित्यिकांसाठी गेल्या 9 वर्षापासून पुरस्कार देण्यात येत आहे.5000/- रुपये,स्मृतीचिन्ह् असे पुरस्काराचे स्वरुप असून 19 जुलै रोजी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 मे 2016 ते 15 जून 2017 या कालावधीत ज्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा लेखकांनी 25 जून 2017 पर्यंत आपली पुस्तके दोन प्रतीत अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रामनारायण पत्रकार भवन, ता.अलिबाग जि.रायगड या पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी केले आहे.संपर्कासाठी फोन नं.9370690626,9767341291 असा आहे.

00000

Comments