अतिवृष्टीचा इशारा


अलिबाग दि.19,(जिमाका):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन आज प्राप्त पुर्वसुचनेनुसार येत्या 48 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी  (7 ते 12 सेमी) आणि काही ठिकाणी  त्यापेक्षा अधिक (12 ते 24 सेमी) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  तसेच या कालावधीत समुद्रही खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आवश्यक उपाययोजना  कराव्या. अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी  बचाव पथके, साहित्य, रुग्ण्वाहिका आदी सुविधा सज्ज ठेवाव्यात.नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत.सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी  प्रवाहाच्या मार्गातील अडथळे  दुर करावेत. कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात  0241-222118/222097/222322 कळवावी, असे आवाहन आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग  आपत्तीकालीन कार्य कक्षातर्फे करण्यात आले आहे.

०००००

Comments