तांडा वस्ती सुधार योजना अशासकीय सदस्य निवडीसाठी प्रस्ताव मागविले


अलिबाग,दि.24(जिमाका)- सामाजिक न्याय विभागांतर्गत  लमाण,बंजारा व इतर तत्स्म जातींच्या तांडा,वस्तीला  मुख्य गावाशी जोडण्यासाठी तांडा वस्ती सुधार येाजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याकरिता  सन 2017-18 साठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येत असून अशासकीय अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी अर्ज,प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या समितीच्या अशासकीय अध्यक्ष व सदस्यपदी लमाण,बंजारा व  भटक्या जमाती पैकी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. समितीचे अध्यक्ष  व सदस्य् यांचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असेल आणि सदर कार्यकाल संपुष्ठात येण्यापूर्वी किंवा संबंधित अध्यक्ष व सदस्य यांनी राजीनामा दिल्यास किंवा पदावरुन काढून टाकल्यास एक महिन्याच्या आत नव्याने समिती पुनर्गठीत करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज,प्रस्ताव दि. 29 जुलै 2017पर्यंत विहीत नमुन्यात सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण रायगड अलिबाग  येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी कार्यालय दूरध्वनी क्र.02141-222288.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन