आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आज जीसटी प्रशिक्षण
अलिबाग दि.3,(जिमाका)- देशभरात 1 जुलै
2017 पासून जीएसटी कायद्याची अमंबजावणी सुरु झाली आहे. या नवीन कायद्यासंदर्भात देशभरात
विविध प्रशिक्षण राबविली जात आहेत. जिल्ह्यातील विविध शासकिय विभागांच्या आहरण
संवितरण अधिकाऱ्यांसाठी शुक्रवार दि.4 रोजी
TDS(Tax Deduction at Source) वरील Provision व त्या संबंधीचे Payment ची प्रक्रिया
याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर
प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हॉल मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा
कोषागार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment