रायगड किल्ला जतन संवर्धन व परिसर विकास आराखडा बाबत बैठक संपन्न


अलिबाग दि. 10:- (जिमाका) रायगड किल्ला जतन संवर्धन  व परिसर विकास आराखडा बाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवेशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक संपन्न झाली.
       या बैठकीला  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अधिक्षक अभियंता श्री.मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग,महाडचे कार्यकारी अभियंता श्री. सातपुते, एम.टी.डी.सी.चे सल्लागार राहुल समेळ  आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आढावा घेतांना प्रत्यक्ष आराखडयातील कामांची सद्यस्थिती व करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती घेऊन, पुरातत्व विभागाकडील 5 कामांच्या अंदाजपत्रकास लवकरात लवकर मान्यता देण्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे व भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधितांना यावेळी दिले. भू संपादनाची कार्यवाही 80 टक्के पूर्ण झाली असून पुढील कार्यवाही लवकरात  लवकर करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. रायगड किल्ल्यावरी तीन दगडी मार्गीकांचे काम  सप्टेंबर 2017  मध्ये सुरु करण्यात येणार असून याबाबत सर्व अधिकाऱ्यांची नियमित बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या. 
                               000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन