अलिबाग येथे 25 रोजी डाक अदालत

अलिबाग,(जिमाका)दि.14:-  भारतीय डाक विभागाच्या अधिक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवार,दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार,समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले  नाही,अशा टपाल, स्पीडपोस्ट्, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक,ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर रायगड विभाग यांचेकडे दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत पोहचतील अशारितीने पाठवाव्या, असे आवाहन अधिक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान