ऑक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन मंगळवार दि.3 रोजी

अलिबाग,(जिमाका)दि.26:- जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु ऑक्टोबर-2017 मध्ये पहिल्या सोमवारी,दि.2ऑक्टोबर 2017 रोजी महात्मा  गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणारा लोकशाही दिन पुढे येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात  होईल. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या तक्रारी लोकशाही दिनात करावयाच्या आहेत त्यांनी आपल्या तक्रारींसह दि.3ऑक्टोबर रोजी  उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी केळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन