प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना:ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर पर्यंत स्विकारणार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- पर्जन्यमानातील दोलायमानता आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमिवर शेतीचे जलव्यवस्थापन ही बाब अत्यंत संवेदनशील झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे किफायतीशीर वापर करुन उत्पादकतेत वाढ करणेसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होऊन सिंचनद्वारे खते व किटकनाशकांचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास तणांचे नियंत्रण तसेच आंतरमशागत व्यवस्थापन सुलभ होऊन पिकावर किड व रोगांचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात झाल्यास पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होईल.
यासाठी सन 2017-18 करीता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म् सिंचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे अर्ज या वेबसाईटवर ई-ठिंबक आज्ञावली मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे केलेल्या अर्जाची व त्यात नमूद केलेल्या अभिलेखांची (7/12,8अ,बॅक पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत,आधारकार्ड इ.बाबी)प्रत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने वरील मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.ई-ठिंबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभधारकांचा आधार क्रमांक हाच संबंधित लाभधारकाचा लॉग ईन आयडी असणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पुर्वसंमती प्रदान करण्यात येईल.
यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म् सिंचन कार्यक्रमात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा मंडळ कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.असे  आवाहन जिल्हा अधिक्षक,कृषि अधिकारी, पांडुरंग शेळके रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन