जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम




             अलिबाग जि. रायगड, दि.२- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचे स्वच्छता दूत  डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पोलीस मुख्यालय,जिल्हा परिषद,जिल्हा न्यायालय,जिल्हा सामान्य  रुग्णालय,जिल्ह्यातील सर्व प्रांत,तहसील कार्यालय,विविध शासकीय कार्यालय,सर्व ग्रामपंचायती  समोरील परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केले .यात सरकारी अधिकारी , कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान