प्रवाशांची सुरक्षा महत्वाची ----जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी


अलिबाग दि.25 :- रायगड जिल्ह्यातील नॅशनल हायवे तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांची सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे दालनात आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पासरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, कार्यकारी अभियंता राष्ट्ीय महामार्ग विभाग महाड एस.के.सुरवसे, वाहतूक नियंत्रक मनोजकुमार म्हात्रे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हेमांगी पाटील व संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील  ब्लॅक स्पॉट बाबत उपाययोजना करण्यासाठीच्या निधीची तरतूद, अंमलबजावणीचे वेळापत्रक अंमलबजावणीसाठी जबाबदार शिर्ष अधिकारी यांची निश्चिती करावी.  तसेच   जिल्ह्यातील रस्त्यावर असलेल्या अधिकृत व अनधिकृत गतीरोधकांचाही आढावा घेण्यात आला.    अपघात कमीत कमी होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी गतीरोधक तयार केले आले आहेत.  या गतीरोधकांना कलर लावणे तसेच रत्यांच्या बाजूच्या साईडपट्टया भरुन घ्याव्यात जेणेकरुन अपघाताचे प्रमाण कमी होतील.      त्याकरिता जिल्ह्यातील सर्व गतीरोधकांचा सविस्तर तालुकानिहाय आढावा घेण्याचे या बैठकीत ठरले.   
या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000













Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन