माहे फेब्रुवारी-2017 परिक्षा अर्हताधारक विद्यांर्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- राज्यात
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा
परिषदेमार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालांवर
प्रामुख्याने गुणवत्तेनुसार उच्च प्राथमिक (इ.5वी) व माध्यमिक इ.8वी शाळांतील
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची
समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणूकींच्या आधारे पुढे चालू राहाते. उच्च
प्राथमिक शिष्यवृत्तीचा (इयत्ता पाचवी) कालावधी 3 वर्ष व माध्यमिक (इ.8वी) कालावधी
दोन वर्ष आहे. ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी दिली जाते.
शैक्षणिक वर्ष 2017 मधील माहे फेब्रुवारी-2017 परिक्षेमधील अर्हताधारक
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावयाचे आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात
येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती-
माध्यमिक शाळांत परिक्षेत
कमीत कमी 60 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती
देण्यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ, महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ.11
वी) अखेरीस घेण्यात येणाऱ्या
परिक्षेत किमान 45 टक्के गुण मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या इ.12 वी पुढे चालू राहातात. सदर योजना अनुदानित
शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती-
आर्थिकदृष्ट्या
मागासप्रवर्गातील हुशार मुले,मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्यावेळी शेकडा
50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अशांना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित
राहू नये म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते. इ.11 वी मध्ये 50 टक्के गुण मिळवून
पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती 12 वी पर्यत चालु
राहाते. या शिष्यवृत्तीसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.30,000/- पेक्षा जास्त
नसावे. या योजना अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत.
संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत
सरकारच्या शिष्यवृत्त्या-
माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित
करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या गुणवत्ता शिष्यवृत्त्या दिल्या
जातात. इयत्ता आठवी मधील वार्षिक परिक्षेमध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या
गुणवत्तेवर इयत्ता नववी व दहावी आणि
दहावीच्या गुणवत्तेवर इयत्ता अकरावी व
बारावी मध्ये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या योजना अनुदानीत शाळांमधील
विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
पात्रतेचे निकष- wwwmahadbt govin वर ज्ञान
बँक (Knowledge Bank) या ठिकाणी उपलब्ध आहेत. वरील योजनांची मंजूर रक्कम
विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्या
करीता विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करुन घ्यावे.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी
अर्ज करण्याची पद्धत- सन 2017-18 पासून विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र शासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय डीबीटी पोर्टल,
MAHADBT PORTAL www.mahadbt.gov.in वर
देण्यात आलेल्या युजर मॅन्यूअल, एफएक्यू चा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर
दिलेल्या सूचनांचे पालन करुन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता
संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरुन घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर
मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड
नंबर मोबाईल नंबरशी संलग्न करुन घ्यावेत. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड
जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment