छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अर्ज भरण्याची पुन्हा संधी


अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.1- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन यापूर्वी अर्ज सादर केले आहेत.  तरी  जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. अर्ज करण्याचा कालावधी हा 1 मार्च ते 31 मार्च 2018 पर्यंत आहे. मात्र यापूर्वी या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता  येणार नाही.
या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत  शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज मोफत स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी https://csmssy.mahaonline.gov.in या वेबपोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करावेत तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,रायगड अलिबाग यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक