रायगड जिल्हा कृषि महोत्सवाची यशस्वी सांगता : 40 हजार ग्राहकांची भेट, 2 कोटींहून अधिक शेतमालाची विक्री



        अलिबाग, जि. रायगड, दि.27 (जिमाका)- रायगड जिल्हा कृषि महोत्सवाची काल (दि.26) यशस्वी सांगता झाली. गेल्या पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात  तब्बल चाळीस हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली तर 2 कोटी 32 लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली, अशी माहिती आयोजकांतर्फे प्रकल्प संचालक (आत्मा) एम.एस.डावरे यांनी दिली.
जिल्हा कृषि महोत्सवास गुरुवार दि.22 पासून प्रारंभ झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवसापासूनच या महोत्सवास भेट देणाऱ्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची गर्दी होत होती. या महोस्तवाचा समारोप काल (दि.26) करण्यात आला. समारोपीय समारंभास आर.सी.एफ.चे जिल्हा मार्केटींग अधिकारी वराडकर, प्रकल्प संचालक (आत्मा) एम.एस. डावरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा रामदास बघे, कृषि अधिकारी, जि.प. रायगड मार्कड, हे उपस्थित होते.
            प्रास्ताविकात एम.एस. डावरे यांनी माहिती दिली की, कृषि महोत्सवाच्या कालावधीमध्ये चाळीस हजाराहून अधिक ग्राहकांनी भेट देवून सुमारे दोन कोटी 32 लाख रुपये रकमेच्या मालाची विक्री झाली. यामध्ये तांदूळ, नाचणी, कडधान्य, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रगतिशील शेतकरी खालापूर राजेंद्र पाटील यांनी शिंगाडयाची शेती, कमळाची शेती अशा वेगळ्या प्रयोगशिल शेतीची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तर पनवेल येथील प्रगतीशिल शेतकरी कमलाकर घरत यांनी  सांगितले की त्यांना, कृषि महोत्सवामध्ये शेतकरी गटांनी आणलेला माल या पाच दिवसामध्ये विक्री करून विक्रीचे तंत्रज्ञान मिळाले तसेच प्रती स्टॉल दर दिवशी 18 ते 20 हजाराची कडधान्य व भाजीपाला विक्री झाला असे सांगितले. कडधान्यामध्ये चवळी, मटकी, वाल, वरी, सेंद्रिय मालाला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. गणेश भगत, अध्यक्ष, वरदा खामजाई शेतकरी गट, रोहा यांनी,  शासनाने कृषि महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना नविन विक्रीचे दालन उपलब्ध करून दिल्याबाबत सर्व सहभागी विभागांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील श्रीम. आश्विनी माळी, अध्यक्ष, श्री. गणेश बचत गट, चौक, ता. खालापूर व श्रीम. हेमलता बबन पिंगळे, अध्यक्ष, वक्रतुंड बचत गट, चौक, ता. खालापूर या बचत गटाच्या महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उद्यान पंडीत पुरस्कारप्राप्त प्रकाश शांताराम ठाकूर, उरण यांनाही यावेळी सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच सन 2017-18 मध्ये राज्यस्तरीय भात पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या 5 व जिल्हास्तरीय भात पिक स्पर्धेतील 21 शेतकऱ्यांचा तसेच आत्मांतर्गत वैशिष्ठयपूर्ण काम करणाऱ्या 16 शेतकरी गटांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अशा एकुण 43 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कृषि महोत्सवामध्ये एकुण 194 स्टॉल धारकांनी सहभाग नोंदविला.
दि. 22 मार्च ते 26 मार्च 2018 या कालावधीत विक्री झालेल्या मालाचा तपशिल खालीलप्रमाणे
अ.क्र.
मालाचा तपशिल
विक्री झालेला माल
(क्विंटल)
रक्कम (लाख) रुपये
1
भात
55
30.25
2
नाचणी/वरी
15
7.50
3
कडधान्य
30
24.00
4
भाजीपाला
150
45.00
5
पपई
10
1.00
6
कलींगड
200
2.00
7
नारळ
1100 नग
0.20
8
पांढरा कांदा
40
6.00
9
हळद
2
4.00
10
मशरूम
0.50
0.15
11
खाद्यपदार्थ
-
26.00
12
इतर गृहोपयोगी वस्तू
-
86.00
एकुण रक्कम
232.100
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपील पाटील यांनी केले. तर प्रकल्प उपसंचालक आत्मा डी.एस. चव्हाण, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन