दि.9 मार्च रोजी : दिव्यांगासाठी उद्या पेण येथे कार्यशाळा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-रायगड जिल्हा परिषद व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च रोजी पेण येथे दिव्यांगासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित राहाणार आहेत. प्रशिक्षण व कार्यशाळेचे ठिकाण-वनगे हॉल, पेण खोपोली बायपास रोड, पेण जि.रायगड. वेळ सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत तसेच दुपारी दोन वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
 तरी दिव्यांगांच्या योजनासंबंधी माहिती जास्तीत जास्त जनतेला व्हावी. यासाठी या कार्यशाळेस आपण उपस्थित राहावे,असे आवाहन जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग रायगड   यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक