पेण येथे शुक्रवारी दिव्यांगासाठी कार्यशाळा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- रायगड जिल्हा परिषद व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त
विद्यमाने शुक्रवार दि.9 रोजी पेण येथे दिव्यांगासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे
उपस्थित राहाणार आहेत. सदर कार्यशाळा -वनगे हॉल,पेण खोपोली बायपास रोड, पेण
जि.रायगड. येथे सकाळी दहा ते दुपारी साडेचार
यावेळात होणार आहे. या कार्यशाळेत
दिव्यांगांच्या योजनासंबंधी माहिती सहभागींना दिली जाणार आहे. या कार्यशाळेस
उपस्थित राहावे,असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ
भोर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment