कृषि महोत्सवात सगुणा तंत्रज्ञान व मत्स्यशेतीच्या परिसंवादास शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद


                                                                                                 
अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.25- कृषि महोत्सवात सगुणा तंत्रज्ञान व मत्स्यशेतीच्या परिसंवादास शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या परिसंवाद कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे, शास्त्रज्ञ के.व्ही.के.रोहा डॉ.विवेक वर्तक, जलमित्र पुरस्कार विजेते संतोष पेरेणे,  दूरदर्शनचे निवृत्ती संचालक शिवाजी फुलसुंदर, आकाशवणी मुंबईचे संतोष जाधव, प्रकल्प संचालक (आत्मा) एम.एस.डावरे, विजकुमार खाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड रामदास बघे, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर भडसावळे यांनी एस.आर.टी. तंत्रज्ञानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा अतिरेक केल्यामुळे सुपिकता कमी होत असल्याने उत्पादनात घट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संवर्धीत शेती करुन वेळ, श्रम, खर्च कमी करुन उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी एस.आर.टी. तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आवाहन त्यांनी केले. कर्जत तालुक्यातील मोग्रज गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी संपूर्ण गावात एस.आर.टी. तंत्रज्ञान यशस्वीरीत्या राबविले आहे.
डॉ.विवेक वर्तक यांनी शेततलावातील मस्त्यसंवर्धन, मस्त्यजिरे पुरवठा, निलक्रांती योजना, तरंगणारे खाद्य व मुल्यवर्धीत मस्त्य प्रकियांबाबत  मार्गदर्शन केले. तर संतोष जाधव यांनी आकाशवाणीच्या अस्मिता वाहीनी तसेच किसान वाहीनी बाबत माहिती देऊन ऑल इंडिया रेडिओ मोबाईल ॲप बाबत मार्गदर्शन केले. विजय कुमार खाडे यांनी बाजाराभिमुख उत्पादन, तंत्रज्ञानाचा वापर भाजीपाला उत्पादन करताना करावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये एम.एस.डावरे यांनी कृषि महोत्सवाचे उद्देश, विविध स्टॉलचा सहभाग, ग्राहकांनी खरेदीसाठी दिलेला उस्फूर्त प्रतिसाद याबाबची माहिती दिली. गेल्या दोन दिवसात कृषि महोत्सवाला दहा ते बारा हजार ग्राहकांनी भेट देवून 70 ते 80 रकमेच्या मालाची विक्री झाली. यामध्ये तांदूळ, नाचणी, कडधान्य, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, महिला बचत गटांची उत्पादने यांची विक्री झाली. सेंद्रीय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करुन तसेच फळझाडे लागवड करुन पर्यावरण संवर्धानात आपला सहभाग नोंददिवावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डी.एस.चव्हाण प्रकल्प उपसंचालक (आत्मा) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन