एमएचटी सीईटी -2018 ची सामाईक प्रवेश परिक्षा 10 मे रोजी; जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची यादी जाहीर


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- सक्षम प्राधिकारी व संचालक,सीईटी कक्ष, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी -2018 ची सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवार दि. 10 मे रोजी होणार आहे. ही परीक्षा रायगड जिल्ह्यातील ज्या 20 परीक्षा केंद्रांवर होणार आहे त्या केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ती याप्रमाणे-
1.जा.र.ह.कन्याशाळा व कनिष्ठ् महाविद्यालय,अलिबाग,
2.को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, अलिबाग, 3.जे.एस.एम.कॉलेज,अलिबाग,
4.ॲड. दत्ता पाटील लॉ.कॉलेज अलिबाग,
5.चिंतामणराव केळकर विद्यालय,रेवदंडा बायपास रोड,अलिबाग जि.रायगड,
6.सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल चेंढरे, अलिबाग,
7.आर.सी.एफ. सेकंडरी व हायर सेकंडरी विद्यालय कुरुळ अलिबाग,
8.पी.एन.पी. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स् कॉलेज, वेश्वी अलिबाग,
9.पी.एन.पी. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, वेश्वी, अलिबाग,
10. श्री.स.म.वडके विद्यालय,चोंढी, ता.अलिबाग,
11.को.ए.सो.ना.ना.पाटील, हायस्कुल व ज्युनियर कॉलेज पोयनाड ता.अलिबाग,
12.पेण एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज,पेण(केंद्र-1)
13.पेण एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज,पेण(केंद्र-1),
14.सौ.एम.एन.नेने कन्या विद्यालय पेण,
15.सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज,पेण,
16.पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल,पेण,
17.डॉ.पंतगराव कदम कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स पेण,
18. को.ए.सो. लिटिल अेंजल स्कूल, मुंबई गोवा हायवे रोड, झी गार्डनजवळ,पेण,
19.जय किसान विद्यामंदीर, वडखळ, ता.पेण,
20. शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजीनगर, रामवाडी, ता. पेण.
सर्व विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन किरण पाणबुडे,निवासी उपजिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन