जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 21 रोजी परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी शनिवार दि.21 रोजी होणार असून या परीक्षेचे प्रवेशपत्र हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे प्रवेश पत्र चाचणी पात्र परीक्षार्थिंनी (ऑनलाईन) सी.एस.सी. सेंटर मधून डाऊनलोड करावे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफ लाईन अर्ज भरलेले आहेत त्यांनी आपण शिकत असलेल्या शाळेतून अर्ज घ्यावेत. ऑफलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत गटातील सर्व शाळांना उपलब्ध करुन दिले जातील. विद्यार्थ्यांनी  परिक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे. या बाबत काही अडचणी असल्यास  सकाळी नऊ ते सायं. साडेपाच वा.पर्यंत (शनिवार, रविवार या दिवशी सुद्धा) विभागीय पातळीवर 8208331382 व 9325416896 व विद्यालय पातळीवर  9420650395 व 7709962313 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी, पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर जि. रायगड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन