पेण येथे तारण सोन्याचा 21 रोजी जाहीर लिलाव



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:-पेण बँकेच्या शाखेतून ज्या कर्जदारांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे त्याची मुदत संपली असून नोटीसद्वारे सुद्धा त्यांना कळविण्यात आले होते. तथापि आजतागायत कर्जफेड न केल्याने बँकेकडे तारण असलेले दागिने जाहीर लिलावाने विक्री करुन कर्ज वसुली करण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासक मंडळाने घेतला आहे. बँकेकडे तारण दागिन्यांची विक्री जाहीर लिलावाद्वारे  शनिवार दि.21 रोजी सकाळी अकरा वाजता बँकेचे मुख्य कार्यालय पेण  येथे करण्यात येणार आहे,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड तथा प्रशासक मंडळ सदस्य पेण को. ऑप अर्बन बॅंक लि. पेण यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान