अनु.जाती-जमाती, भटक्या जमाती,अपंग विद्यार्थ्यांसाठी जावळी ता. माणगाव निवासी शाळेत मोफत शिक्षण सुविधा


अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.3:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी ता.माणगांव जि. रायगड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून इयत्ता सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश  प्रक्रिया सुरु झाली असून मोफत प्रवेश दिला जात आहे.
शासकीय निवासी शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश  आरक्षण पुढीलप्रमाणे-
अनुसूचित जाती-80 टक्के, अनुसूचित जमाती-10 टक्के,अपंग प्रवर्ग-3 टक्के, विमुक्त् जाती व भटक्या जमाती-5 टक्के, तर विशेष मागास प्रवर्ग-2 टक्के
शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये-शाळा विभाग व निवासाकरता स्वतंत्र इमारती,शासनामार्फत राहण्याची व जेवण्याची विनामूल्य सोय,शासनामार्फत मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, निवासी साहित्य, सुसज्ज ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, खेळाचे भव्य मैदान व क्रीडा साहित्य
अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे-
विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला.(स्वतःचा नसल्यास वडिलांचा), पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला(सरपंच,पोलीस पाटील),विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे अपंग प्रमाणपत्र.
शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया दि.1 एप्रिल पासुन झाली आहे. तरी शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड -अलिबाग येथे (दूरध्वनी क्र.02141-222288) संपर्क साधावा. प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरुन कागदपत्रांसह सहा. शिक्षक निवासी शाळा जावळी (मोबाईल  नं.8446379520) या कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन