माथेरान सनियंत्रण समितीची गुरुवारी बैठक
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24-भारत सरकारच्या पर्यावरण व वन
विभागाच्या अधिसूचनेनुसार रायगड व ठाणे
जिल्ह्यातील एकूण 89 गावांचा (काही
पूर्ण व काही भागत:) प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच
अधिसूचनेतील तरतुदीनुसार सनियंत्रण समितीही गठित करण्यात आली आहे. या संवेदनशील
क्षेत्रातील कोणतीही विकास कामे सनियंत्रण समितीच्या मान्यतेने करावयाची असतात.
यासंदर्भात माथेरान सनियंत्रण समितीची सातवी बैठक गुरुवार दि. 3 मे रोजी दुपारी साडेतीन वा. राजस्व सभागृह,जिल्हाधिकारी
कार्यालय,रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी संवेदनशील
क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव दहा प्रतित समितीच्या मान्यतेसाठी किमान पाच
दिवस आधी सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment