ब्रेक चाचणी पथाचा लोकार्पण सोहळा रविवारी
अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.5- प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या मौजे तळोजे मजकूर,ता.पनवेल येथील शासकीय
जागेत सीएसआर फंडातून तयार करण्यात आलेल्या ब्रेक चाचणी पथाचा लोकार्पण सोहळा
रविवार दि.8 रोजी रोजी सकाळी दहा वा. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
मंत्री ना.अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिवहन,खारभूमी विकास ना.दिवाकर रावते यांच्या
शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा
राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार
आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान
परिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. अनिल तटकरे, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,आ.बाळाराम
पाटील, विधानसभा सदस्य आ.प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, आ. सुरेश
लाड, आ.धैर्यशील पाटील, आ. सुभाष पाटील, आ. अवधुत तटकरे हे मान्यवर प्रमुख पाहूणे
म्हणून उपस्थित राहाणार आहेत.या कार्यक्रमास परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज
सौनिक (भा.प्र.से.), तसेच रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.) हे
ही उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन अपर परिवहन आयुक्त सतीष सहस्त्रबुद्धे,
सह परिवहन आयुक्त प्रसाद महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल विभाग लक्ष्मण
दराडे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment