गोंधळपाडा येथे मागासवर्गीय मुलींसाठी मोफत शासकीय वसतीगृह



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह हे गोंधळपाडा अलिबाग,जि.प.मराठी शाळेच्या बाजूला जि.रायगड येथे कार्यरत आहे. या शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत.  वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृहात विहीत वेळेत जमा करणे आवश्यक् आहे.
इयत्ता आठवीपासून  गरीब,  हुशार,  होतकरु,  मागासवर्गीय,आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
वसतीगृहात विद्यार्थिनींना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.सहाशे निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थींना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा,क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी अटी
            प्रवेशपात्र विद्यार्थींनींचे पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न् अनु. जाती, अनु. जमाती विद्यार्थींनीकरिता रु.2 लाख  चे आत व विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागास प्रवर्ग, विद्यार्थ्यांकरीता रुपये रु.1 लाख चे आत असावे.ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांचे सहिचा सन 2018-19 मधील उत्पन्नाचा दाखला व जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक व आधारकार्ड, सत्यप्रत,शाळा कॉलेजचे बोनाफाईड जोडणे आवश्यक आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृह प्रवेश अर्ज हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वसतीगृहाची वेबसाईट https://aaplesarkar.mahaonline.gov.in. वर उपलब्ध आहेत. तरी अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह गोंधळपाडा अलिबाग  यांचेशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन  गृहपाल, मागास वर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृह अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक