खरीप हंगामासाठी पिक कर्ज उपलब्धः शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  जिल्ह्यात 18 हजार 73 पात्र शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्ममाफी देण्यात आली आहे.  तरी खरीप हंगाम 2018 साठी  सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिक कर्जासाठी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बॅंकांकडे आपली पिक कर्जाची मागणी नोंदवावी, व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.  पिक कर्ज मिळण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  रायगड- अलिबाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02141-222013. व्यापारी बॅंकांमधून पिक कर्ज मिळण्यास अडचण आल्यास व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, तथा बॅंक ऑफ इंडिया रायगड –अलिबाग यांच्या कार्यालयाशी समक्ष अथवा 02141-222344 /222895 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments