फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता माध्यम प्रतिनिधींसाठी उद्या कार्यशाळा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)30- जिल्हाधिकारी
कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती
कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता’ या
विषयावर बुधवार दि.1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 वाजता सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक
अनिल पारसकर (भापोसे) तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ.
गणेश मुळे हे उपस्थित राहणार आहेत. या
कार्यशाळेस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडिया कक्षाचे वरिष्ठ सहायक
संचालक श्री. किशोर गांगुर्डे हे मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमात काम करणाऱ्या
प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. तरी वृत्तपत्रांचे
संपादक, पत्रकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे
प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी
या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.
मिलिंद दुसाने यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment