नाव्हे येथे पुरात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका
अलिबाग, जि. रायगड, दि.9 (जिमाका)- भात लावणीच्या कामासाठी शेतात
गेलेले दोघे जण पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. नाव्हे ता. रोहा येथे रविवारी
(दि.8) ही घटना घडली. आपत्ती निवारण कक्षाच्या जीवरक्षक पथकाने प्रयत्नांची शर्थ
करुन आज (दि.9) पहाटे पाच वाजता या दोघांची पुराच्या वेढ्यातून सुखरुप सुटका केली.
या संदर्भात जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन कक्षातून रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत होता. नाव्हे येथील भिकाजी
गोविंद डबीर आणि किशोर भिकाजी डबीर हे दोघे
आपल्या शेतात भात लावणीच्या कामासाठी गेले होते. दरम्यान आलेल्या पावसामुळे कुंडलिका
नदीला पूर आल्यामुळे त्यांचे शेत पाण्याने वेढले गेले.
डबीर यांचे शेत हे दोन नदीच्या पात्रांजवळ आहे. शेतात भात लावणी करीत असताना नदीचे पाणी अचानक वाढले. या वाढलेल्या पाण्यात डबीर पितापुत्र अडकले. पाण्याचा वाढता जोर पाहून दोघेही शेतातच सुरक्षित ठिकाणी थांबले होते. हे दोघे अडकल्या बद्दल कुणालाच माहिती नव्हती. रात्री अडीच वाजता मुंबई येथे असणाऱ्या त्यांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोन करून या घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून तातडीने स्थानिक रोहा तहसिलदार सुरेश काशिद यांना कळविण्यात आले. त्यांनी तात्काळ जीव रक्षक पथकास पाचारण केले. या पथकाने महेश सानप यांच्या नेतृत्वात उपाययोजना करुन पहाटे पाच वाजता अडकलेल्या पिता पुत्रांची सुखरुप सुटका केली.

Comments
Post a Comment