10 डिसेंबर रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

            नवी मुंबई,दि.0:- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार  दि.10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवननवी मुंबई-400 614 येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत. 
निवेदन स्विकारण्यासाठी निकष
            शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दि.26 सप्टेंबर 2012 मधील नमुद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर (22/11/2018 पर्यंत) या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
सदर दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असेउप आयुक्त,(सामान्य)  कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000 000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक