राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर सर्व न्यायालये व न्यायाधिकरणे येथे  शनिवार दि.8 रोजी 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आले आहे.
 या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,138 एन आय ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड,वीजवितरण,राष्ट्रीयकृत बॅंका आणि पतसंस्था यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे. तसेच या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अभय वाघवसे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप ज.मोहीते यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक