प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 25-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ हा अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमात  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सकाळी सव्वा नऊ वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होईल. या समारंभास जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत