वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेची बैठक 21 रोजी



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- राज्य सरकारी आहरण व संवितरण अधिकारी आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेत सहभागी होणारे व झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेच्या अनुषंगाने गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी एमडीइंडिया (TPA) यांच्यासमवेत जंजिरा हॉल अलिबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील जुलै 2018 ते जून 2019 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज इ.मुल्ला यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान