राष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखेत बदल
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- महाराष्ट्र राज्य विधी
सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दि.9 मार्च रोजी 'राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण
मुंबई यांचे निर्देशानुसार आता सदरची लोकअदालत रविवार दि. 17 मार्च रोजी आयोजित करण्यात
येणार आहे.
या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली
भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,138 एन आय ॲक्ट खालील
प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत.
तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची
वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड,वीजवितरण,राष्ट्रीयकृत बॅंका आणि
पतसंस्था यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या अदालतीमध्ये तडजोडीसाठी
ठेवण्यात येणार आहेत.
या
लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा
अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे. तसेच या लोकअदालतीचा जास्तीत
जास्त लोकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अभय वाघवसे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग
अभय सो.वाघवसे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment