किसान क्रेडीट कार्ड वाटप योजना शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील
सर्व शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. या
योजनेस पात्र शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी
संस्था तालुका कार्यालयांना भेट देऊन त्यांच्याकडील असलेला अर्ज भरुन तो संबंधित
बँक शाखेकडे देण्यात यावा. या अर्जासोबत शेतकऱ्यांनी त्यांचा स्वत:चा आधारकार्ड,
7/12 उतारा, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे कोणत्याही बँकेमध्ये खाते
उघडलेले नाही त्यांनी सदरील अर्ज भरुन नजिकच्या बँक शाखेत आपले खाते उघडणे आवश्यक
आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करुन अधिकाधिक
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
00000
Comments
Post a Comment