शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळः थेट कर्ज योजनेच्या मर्यादेत एक लाख रुपयांपर्यंत वाढ


अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):- शामराव पेजे कोकण इतर मागारवर्गीय आर्थिक विकास महामंडळ  मर्यादित मार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब, होतकरू व बेरोजगार व्यक्तिंना व्यवसाय/ स्वयंरोजगार करण्यासाठी अल्प व्याज दराने कर्ज दिले जाते. त्याअंतर्गत महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा आता 25 हजार रुपयांवरून  1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकषः लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी व इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. वय 18 ते 55 वर्षे दरम्यान,  एकत्रिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे,  सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदार थकबाकीदार नसावा,  शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत नियुक्त संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारास प्राधान्य.
या योजेनअंतर्गत घेतलेले कर्ज हे 4 वर्षा फेडावयाचे असते. नियमित कर्जफेड केल्यास  व्याज आकारले जात नाही.  या अंतर्गत मत्स्य व्यवसाय, मोबाईल दुरुस्ती, गॅरेज, फ्रीज एसी दुरुस्ती,  मटण चिकन शॉप, इ. व्यवसाय करता येतात.  तरी गरजू व इच्छुकांनी  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत, तळमजला, गोंधळपाडा, ता. अलिबाग, जि. रायगड (दूरध्वनी क्रमांक 02141-224448) येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

Comments