जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 1 कोटी 65 लाख 89 हजार 820 रूपयांचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयास वितरीत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश




अलिबाग, जि.रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील श्रीवर्धन व माणगाव, म्हसळा, महाड, कर्जत यासह काही तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली होती. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  प्रशासनाला दिले होते.
त्याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकसान भरपाई मिळावी, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला होता.   त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 1 कोटी 65 लाख 89 हजार 820 रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
         नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य (योजनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन 2020-21या वित्तीय वर्षासाठी शासन, महसूल व वन विभागाकडून कोकण महसूल विभागास रु.1 कोटी 71 लाख 58 हजार 820 अनुदान प्राप्त झाले होते.  तद्नंतर विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी या निधीचे वितरण करण्यास मंजूरी दिली असून जिल्हाधिकारी रायगड यांना नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, 02, पूर चक्रीवादळे इत्यादी, 113 घरांची दुरुस्ती/पुर्नबांधणी यासाठी सहाय्य (91) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार  खर्च, (91) (01) घरांची दुरुस्ती/पुर्नबांधणी यासाठी सहाय्य, 31 सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (22450371) या लेखाशीर्षाखाली सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी रु.1 कोटी 65लाख  89 हजार 820 इतके अनुदान वितरीत केले आहे. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना ही मदत वितरीत करण्यात येणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन