सामाजिक आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोविड योध्दा म्हणून लढत आहेत करोना विरुध्दचे युध्द…!
यशकथा क्र.8 दिनांक :- 19 मे 2020
ग्रामीण आरोग्य
यंत्रणेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत
210 सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य
यंत्रणेसाठी 38 सामाजिक आरोग्य अधिकारी नेमण्याची कार्यवाही नुकतीच पूर्ण होऊन नेमण्यात आलेल्या या सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांनी
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
दुर्धर आजारांवरील
उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे अधिक सक्षम करण्याचे शासनाचे प्रयत्न
सुरु आहेत.
रायगड
जिल्ह्यात 52 आरोग्य केंद्र, 288 उपकेंद्र तर 9 ग्रामीण रुग्णालये आहेत. करोनाच्या
पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीत जिल्हा प्रशासनाने डेडिकेटेड कोविड
रुग्णालय उभारले आहे. जिल्ह्यातही करोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना या 38 सामाजिक
आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे जिल्ह्याच्या तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला
निश्चितच खंबीर साथ लाभली आहे. जिल्हा परिषद आरोग्य सभापती सुधाकर घारे, मुख्य
कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.सुधाकर मोरे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण केली.
जिल्ह्यात
विविध तालुक्यांमध्ये करोना विषाणूच्या झालेल्या प्रादूर्भावाचे प्रमाण पाहून
त्याप्रमाणे पनवेल 8, उरण 5, माणगाव 5, अलिबाग 4, सुधागड 3, कर्जत-3, पेण 2, महाड 2,
खालापूर 2, रोहा 1, म्हसळा 1, पोलादपूर 1 आणि मुरुड 1 अशा पध्दतीने हे 38 सामाजिक आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय
अधिकाऱ्यांसमवेत कोविड योध्दा म्हणून ग्रामीण भागात करोना विरुध्दचे युध्द लढत
आहेत.
(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
000000
Comments
Post a Comment